नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथील पुरातन नागेश्वर मंदिरात नागापूर ग्रामपंचायतीच्या वतीने जलाभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागपूरचे लोकनियुक्त सरपंच- राजाभाऊ पवार, उपसरपंच – केशरताई पवार, सदस्य- निलेश पवार, पुष्पाताई पवार, रतन खुरसणे, प्रकाश जिरे, विद्या ताई देवरे, रविंद्र नगे, प्रकाश मोरे, सुधाकर बाबा पवार, छबु मामा सोमासे, नवनाथ पवार गणेश राजे पवा र आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी हर हर महादेव, सुहास आण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.









