मनमाड : झेवियर्स स्पोट् र्स क्लब मनमाड व प्रिन्सी मेमोरियल फाउंडेशन( पुणे)द्वारा आयोजित जिल्ह्यातील निमंत्रित संघाच्या भव्य जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी संत झेवियर्स हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे श्री. प्रशांत बनसोडे यांच्या कडून देण्यात आलेले रोख रु.5001चे पारितोषिक एपेक्स -ए नाशिक या संघाने पटकावले. स्वर्गीय निलेश शिंपी यांच्या स्मरणार्थ मित्रपरिवारा तर्फे देण्यात आलेले द्वितीय क्रमांकाचे 3001रु.चे पारितोषिक के.व्ही.नाशिक या संघाने पटकावले. तृतीय क्रमांकाचे श्री. मुकुंद झाल्टे यांच्यातर्फे देण्यात आलेले रोख रु.1001चे पारितोषिक विज्डम हायस्कूल नाशिक या संघाने पटकावले.बेस्टशुटरचे पारितोषिक साई ससाणे, बेस्ट ऑलराऊंडरचे पारितोषिक अश्विन, बेस्ट डिफेन्स चे पारितोषिक ध्रुव बोरा यांनी पटकावले.शिस्तप्रिय संघाचे पारितोषिक मनमाडच्या झेवियर -ए संघाने पटकावले.
या.याशिवाय स्वर्गवासी आनंदीबाई सुमंतराव दोंदे यांच्या स्मरणार्थ श्री.दिवाकर दोंदे यांच्याकडून सर्व चषके देण्यात आली. स्वर्गवासी शशिकला अमोलिक, यादवराव अमोलिक, व संगीता अमोलिक यांच्या स्मरणार्थ 501रु पारितोषिके श्री.सुशील अमोलिक यांच्यातर्फे देण्यात आली.श्री. परविंदरसिंग रिसम यांच्या तर्फेही काही बक्षिसे देण्यात आली.पारितोषिक वितरण प्रसंगी या.फादर लाईड, श्री. प्रशांत बनसोडे, श्री.मुकूंद झाल्टे.श्री.दिवाकर दोंदे श्री.सुशील अमोलिक,सुचित सोनवणे,संदीप सोनवणे,महेश कातकडे,हेमंत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.हेमंत वाले यांनी तर प्रास्ताविक श्री.दत्तू जाधव सरांनी केले.विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आलीत. या स्पर्धेला संत झेवियर विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम नातो यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सर्वश्री दिवाकर दोंदे,अनिल निकाळे, सुधाकर कातकडे , दत्तू जाधव, स्वप्निल बाकळे, तेजस अमोलिक, महेश पाथरकर, लक्ष्मीकांत दरवडे, परविंदर सिंग रिसम, सीमोन स्वामी, रितेश माळी, करण गरुड ,शाहरुख मिर्झा, श्रीकांत फाटे, देविदास गांगुर्डे,सागर साळवे,आदित्य गरुड ,मयुर मुंढे,निरज राजपूत, सिद्धार्थ कुसमाडे अथर्व कुलकर्णी व झेवियर स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.











