loader image
[ays_poll id=7]

गुरुकुल शिक्षण संस्थेत शिक्षकदिन उत्साहात संपन्न

Sep 6, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॳॅण्ड आय.टी.आय नांदगाव या संस्थेत भारताचे दुसरे राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व ५सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा.सुरेश नारायणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजीव धामणे,मारुती जगधने, नाना अहिरे , नुकतीच जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेले व सद्या यशोदा पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेले कळमदरी येथील अक्षय संजय पगार, प्राचार्य विकास झारखंडे,आय.टी.आय.चे प्राचार्य थेटे सर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनुष्य जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. त्यांचे गुण अनंत आहे. ते गुण विद्यार्थ्यांनी आजच्या काळात आत्मसात करुन जीवन यशस्वी करता येईल. व जो शिष्याला मार्ग दाखवतो व त्यावर उपचार करतो तोच खरा गुरु आहे. अश्या गुरुच्या सानिध्यात राहुन तुम्ही तुमचे जीवनमान उंचवावे असे प्रतिपादन अध्यक्षीय मनोगतात प्रा. सुरेश नारायणे यांनी म्हटले. यापुढे ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व मोबाईलच्या अतिवापरापासुन दूर राहण्याचा सल्ला दिला. शिक्षकांना दिलेले ज्ञानाचा दैनंदिन जीवनात योग्य वापर करा. आई-वडिलांइतकेच गुरुचे स्थान आपल्या हृदयात ठेवा. असे संजीव धामणे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले तर मारुती जगधने,अक्षय पगार, प्राचार्य विकास झारखंडे,आय.टी.आयचे प्राचार्य थेटे सर यांनीही शिक्षकांबद्दलचा आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज प्रत्येक कर्मचारी वेळेवर ,व शिस्तबध्द कसे करतात याची सुंदर अशी झलक पीपीटी द्वारे व्हिडिओ फिल्म दाखविण्यात आली. याबरोबरच प्रथम व द्वितीय वर्षात उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गायत्री सानप व खैरनार या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन केले जैन मॅडम,भामरे सर, पाटील सर, सोनवणे मॅडम,अहिरे मॅडम,निकम सर,शिंदे सर,ढासे सर,आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

मनमाड : इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ केंद्र क्रमांक 1376 एच.ए.के. हायस्कूल अँड...

read more
मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड - आजपर्यंत फक्त पाण्यासाठीचे आश्वासने मिळालीत.एकदा एक योजना मंजूर झाली.मात्र काम न करताच...

read more
.