नांदगाव सोमनाथ घोगांणे
येथील सौ .क .मा .कासलीवाल प्राथमिक/ माध्यमिक विद्यालयात आज दि. ०६/०९/२०२३ रोजी शाळेच्या प्रांगणात बालगोपालांनी दहिहंडी फोडुन गोपालकाला साजरा केला व `गोविंदा आला’ या गाण्यावर नृत्य केले.
जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी शाळेतील मुली मुलांनी राधा- कृष्णाचा वेष परिधान करून या उत्सवात हजेरी लावली.
शिक्षकांनी मुलांना गोकूळ अष्टमी आणि दहीहंडी ची माहिती दिली.तसेच मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली.त्या नंतर दही काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.
गोपालकाल्याचे महत्व शाळेचे उपशिक्षक श्री.सिद्धार्थ जगताप सर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, मा.श्री.सुनिलकुमार कासलीवाल ,सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता,सहसचिव प्रमिला कासलीवाल,संचालक महेंद्र चांदीवाल,
तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विशाल सावंत,व श्री.शरद पवार ,गोरख डफाळ उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी बालगोपालांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.












