loader image

नांदगाव येथे सकल मराठा समाजाचा रस्ता रोको. मराठा समाज बांधवाकडून मुंडन करूण निषेध.

Sep 8, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर केलेल्य लाठीमाराचे तीव्र पडसाद नांदगाव शहरात उमटले आहेत. सकल मराठा समाजातर्फे येथील हुतात्मा चौकातील महामार्गावर गुरुवारी सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले.
रास्ता रोको आंदोलन प्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी बोलताना सांगितले की, ज्या ज्या वेळेस मराठा बांधवासाठी राज्य शासनाच्या विरोधात जाण्याची वेळ आली तरी मी आपल्या सोबत आहे…तसेच त्यांनी सांगितले की, गणपती काळात विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे त्यामध्ये अनेक मुद्दे असून पण समान नागरी कायदा संदर्भात
चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आ.कांदे यांनी दिली.
यावेळी काही समाज बांधवांनी मुंडन करत शासनाचा निषेध केला.माजी आमदार संजय पवार, उद्धव ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता, आम आदमी पार्टी चे,विशाल वडघुले, शिवकन्या सौ.संगिता सोनवणे यांच्यासह अन्य नेत्यांनी भाषणं करत राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला.
गेले अनेक वर्ष मराठा समाजा कडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतु सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाही. या संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावा, लाठीचार्ज करणाऱ्यांचा शोध घ्यावा,गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, तसेच लवकरात लवकर मराठा समाजाच्या संपुर्ण मागण्या पूर्ण कराव्या.मराठा समाजाचे मनोज दुरांगे पाटील यांना दिलासा द्यावा…अशी जोरदार मागणी आंदोलकांतर्फे केली गेली. यावेळी तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले.. या आंदोलनात मराठा समाजासह इतर समाज बांधवही सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता..


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.