चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे जन संवाद यात्रेत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल कृषी उत्पादन बाजार समिती चांदवड तालुका सभापती, संजय दगू जाधव चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समाधान जामदार,
काँग्रेस जिल्हाध्यक्ष संपत वक्ते यांनी चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे जनसंवाद यात्रेमध्ये कातरवाडी येथील गरीब शेतकरी शंकर कारभारी झाल्टे यांच्या शेतातील संपूर्ण पिके करपून गेली.माजी आमदार कोतवाल यांनी बांधावरती जाऊन प्रत्यक्षात पिकांची पाहणी केली पाण्याच्या समस्या कातरवाडी येथील वाडी वस्तीवर पाण्याचे टँकर चालू करावा अशी मागणी समाजसेवक भागवत झाल्टे व ग्रामस्थांनी केली व पिकांची नुकसान रस्त्यांची दुरावस्था संदर्भात माहिती दिली. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा गंभीर प्रश्न समोर आहे.
याप्रसंगी कातरवाडी येथील ग्रामस्थ शिवसेना तालुका उपाध्यक्ष कैलास झाल्टे, माजी सरपंच रामदास बापू झाल्टे, समाजसेवक भागवत झाल्टे,भाऊसाहेब झाल्टे, वेडुपटेल गुंजाळ, भारत झाल्टे, गोकुळ झाल्टे,वाल्मीक फुलमाळी, रावसाहेब झाल्टे,संजय झाल्टे, शंकर झाल्टे, श्रावण कोंढरे, मच्छिंद्र झाल्टे व इतर ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.












