नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गणेशनगर येथील जळीतग्रस्त कुटुंबियांना आ. सुहास कांदे यांच्या तर्फे संसारोपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. याबाबत अधीक माहीती अशी की तालुक्यातील माणिकपुंज गणेशनगर येथे काही दिवसापुर्वी जळीत घटना घडली होती, धर्मा लक्ष्मण मेंगाळ, सुनील धर्मा मेंगाळ, सुरज धर्मा मेंगाळ या तीन कुटुंबीयांचे झोपडीचे जळीत झाले होते, या घटनेत संपूर्ण संसार जळून खाक झाला होता तर 2 जनावरांचा मृत्यू देखील झाला होता.
या सर्व घटने बाबत आमदार प्रतिनिधी भाऊराव बागुल यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांना माहिती कळवली असता आज तातडीने या कुटुंबियांना निवासस्थानी बोलावण्यात आले. याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे, सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते या कुटुंबीयांना गृहउपयोगी संसार भेट देण्यात आला यामध्ये गहू, तांदूळ,किराणा, कपडे सर्व भांडे,गॅस कुकर या वस्तूंचा समावेश आहे.
या प्रसंगी विष्णू निकम सर, किरण देवरे, प्रमोद भाबड, सुनील जाधव, सरपंच विष्णू मेंगाळ,कचरू मेंगाळ,विजय चव्हाण, गणेश मोहिते, सदाशिव मेंगाळ,जयराम मेंगाळ, रामभाऊ गिरी, ठकाजी मेंगाळ, साईनाथ रामकर, अशोक कोल्हे उपस्थित होते.








