मेष : व्यवसायात चांगली स्थिती राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृषभ : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.
मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात हितसंबंध निर्माण करू शकाल.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहील. स्वास्थ्य लाभेल.
सिंह : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मुलामुलींची कामे मार्गी लागतील.
कन्या : स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
तूळ : मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक : आध्यात्मिक प्रगती होईल.महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
धनू : तुमच्या वैचारिक आणि बौद्धिक जीवनामध्ये अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.
मकर : संततीसौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मीन : आरोग्य चांगले राहाणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.