मनमाड शहरातील दोन प्रमुख भागांना जोडणाऱ्या श्री. दत्त पूल येथे स्ट्रीट लाईट नसल्याने खूप अंधार असतो. छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील श्री दत्त पूल यांचे उदघाटनाला 3 महिने उलटूनही अद्याप पावेतो पथदीप (स्ट्रीट लाईट )लावले नसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळेस नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
येत्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून याच पुलाला लागुनच गणेश कुंड असल्याने नागरिक मोठया संख्येने येतात. प्रशासनाला या निवेदनाद्वारे 19 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी श्री दत्त पूल येथे सौर ऊर्जा चे पथदीप (स्ट्रीट लाईट )लावण्यात यावे अशी मागणी राजे प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली आहे.
गणेशोत्सवापूर्वी नगर परिषदेने श्री दत्त पुलावर पथदीप न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा
परेश राऊत,अमोल परदेशी,दत्तू मामा शिंदे, गणेश सांगळे,निखिल पवार,मुकुंदा जाधव,सिराज मन्सूरी,मयूर बनकर,किरण शिंदे फिटर,सागर गांजे,रत्नाकर कुलकर्णी,परेश शर्मा,राजेंद्र वाळुंज, सुनील( बाळासाहेब )महाले. विकास घुगे,गंगा कदम, संतोष पवार आदींनी नगर परिषदेला निवेदन देऊन दिला आहे.











