ICMAS संस्थेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ॲबॅकस आणि वैदिक मॅथ चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मनमाड येथील गुडविल गर्ल्स स्कूल येथे चालवल्या जाणाऱ्या ॲबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली. शिवांश धोंडगे, गुंजन गवळी, साची जाधव, दिव्या रायते, ईशान दाभाडे, अर्णव भावसार, संचिता सरोदे, जानवी आहेर, माहेरा सय्यद, शाहू पवार, शुभ्रा संसारे, तन्वी वाले, खुशी बहिरवडे, चेतना भागवत यांना विनर प्राईज मिळाले. तर आराध्या देवरे, आरुष राय, वरद वनवे, ओवी सांगळे, सम्यक अहिरे, ईश्वरी पवार यांना फर्स्ट रनर अप प्राईज मिळाले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक व छत्रे हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री. प्रवीण व्यवहारे सर यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. शिक्षिका सौ. वृषाली पांडे व सौ. हर्षा मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ॲड. शशिकांत काखंडकी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला पालक विद्यार्थी उपस्थित होते.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...








