दोन वर्षांपूर्वी १०/०९/२०२१ गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नांदगाव – मनमाड सह परिसरातील वाचकांसाठी मनमाड ठिणगी न्यूज वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. प्रसार माध्यमांमध्ये झालेल्या डिजिटलायजेशन आणि काळाची मागणी ओळखून मनमाड हून प्रसिद्ध होणाऱ्या आणि स्व. प्रकाशजी गोयल संस्थापक संपादक असणाऱ्या साप्ताहिक मनमाड ठिणगी वेब न्यूज पोर्टल चा श्रीगणेशा करण्यात आला. नांदगाव तालुका तसेच मनमाड शहर परिसरातील ग्रामीण भागात बातम्यांच्या माध्यमातून सातत्याने वाचकांपर्यंत ताज्या बातम्या, व्हिडिओज पाठवत असताना अल्पावधीतच वाचक वर्गाच्या पसंतीस ठिणगी न्यूज पोर्टल उतरले. राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक, धार्मिक तसेच क्रीडा क्षेत्रात होणाऱ्या घडामोडींचा अचूक वेध घेत तत्काळ न्यूज पोर्टल द्वारे वाचकांपर्यंत पोहचवून वाचकांच्या मनात एक वेगळे स्थान या निमित्ताने निश्चितच मिळविले आहे. या दोन वर्षात ठिणगी पोर्टल ने ५,३८,००० व्ह्युअर्स चा आकडा पार केला असून,३,७४,००० वाचकांनी ठिणगी न्यूज पोर्टल ला सोशल मीडिया च्या माध्यमातून भेट दिली आहे. या दोन वर्षात वाचकांचा मिळालेला हा उत्स्फूर्त आशीर्वाद रुपी पाठिंबा आम्हाला येणाऱ्या वर्षात नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. ठिणगी न्यूज पोर्टल चे वाचक, हितचिंतक आणि पत्रकार बांधवांचे अनमोल असे मार्गदर्शन आणि योगदाना शिवाय हे शक्यच नव्हते. पुन्हा एकदा सर्व वाचक, हितचिंतकांना शुभेच्छा आणि सर्वांचे मन:पूर्वक आभार……
राशी भविष्य : ९ ऑगस्ट २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....












