loader image

नांदगाव तालुका स्तरीय योगासन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल विजयी

Sep 11, 2023


मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय योगा स्पर्धेत विजय संपादन केला.
दिनांक ११-०९- २०२३ रोजी मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कुल येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव तालुक्यातील केंद्रीय विद्यालय मनमाड, छत्रे हायस्कुल, के आर टी हायस्कूल, इंडियन हायस्कूल, व्ही जे हायस्कूल नांदगाव, सेंट झेवियर हायस्कुल, व गुड शेफर्ड स्कुल मनमाड या शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. गुड शेफर्ड स्कूल च्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, *यातील विजयी खेळाडू कृष्णा व्यवहारे, अवनी लोखंडे, शुभ्रा गुजराथी यांची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली.* या खेळाडुंना क्रीडा शिक्षक श्री. व्यंकटेश देशपांडे सर व श्री. रिसम परविंदर ( लकी सर) यांनी मार्गदर्शन केले.
गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.