नांदगाव सोमनाथ घोगांणे
शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे गणितीय शिक्षण एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून नांदगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली आहे असे प्रतिपादन सेवा निवृत्त शिक्षक विजय काकळीज यांनी नांदगाव येथे संपन्न झालेल्या एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले.
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी द्वारा आयोजित २२ व्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशनचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी येथील गुप्ता लॉन्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात येवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे, प्राचार्य मनी चावला, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, सेवा निवृत्त शिक्षक विजय काकळीज, अशोक घडेकर, पत्रकार अनिल आव्हाड, महेश पेवाल उपस्थित होते.
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी द्वारे रविवार (दि. १०) रोजी सकाळी अकरा वाजता नांदगाव केंद्रावर २२ व्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदगाव, निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यानंतर दुपारी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येवून यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या संचालिका कल्पना गडेकर यांनी केले, सुत्रसंचलन सुवर्णा आव्हाड यांनी केले तर आभार निशिगंधा काकळीज यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाम गाडेकर, सिद्धार्थ सोनवणे, शिक्षीका गीता बिसेन, सोनाली खैरनार यांनी परिश्रम घेतले.









