loader image

वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन डॉ. पवार: दुष्काळग्रस्तांसाठी उपक्रम हाती घ्या

Sep 12, 2023


 

राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्तिथी लक्षात घेता यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी घेतला केले आहे.

यादिवशी मतदारसंघात वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कोठेही समारंभाचे आयोजन अथवा फलक, जाहिरात लावू नयेत दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पाणी, जनावरांना चारा पुरविण्यासारखे उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तसेच राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यात यंदाचा पावसाळा सुरू होऊन दोन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून देखील पुरेसा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची पिके करपून नुकसान झाले आहे. वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ओढवला आहे.

दुष्काळावर शासन पुरेशा उपाययोजना करीत असले तरी हे संकट नैसर्गिक असल्याने त्याला मर्यादा आहे. राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसासारखा समारंभ करणे औचित्याला धरुन होणार नाही.. उद्या १३ सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.