मनमाड : योगेश म्हस्के- शेतकऱ्यांच्या मित्र असणारा बैल याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा , यंदाच्या वर्षी गुरुवारी पोळा सण सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार आहे .
पोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याची दुकाने देखील बाजारपेठेत सजली आहे , यंदाच्या वर्षी मात्र पोळा सणावर समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी वर्ग हा पोळ्यासाठी लागणाऱ्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी फारसा आनंदी नसल्याने बाजरापेठ ही शांत आहे , मातीचे बैल विक्री करणारे व्यापारी देखील निरनिराळे व विविध रंगी बैल जोड्या घेवून बाजारात दाखल झाले आहेत.
परंतु या खरेदीसाठी देखील नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसुन येत आहे.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्यासाठी रंगीबेरंगी झुल, नवीन कासरे व इतर साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करावी अशी अपेक्षा व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे.













