loader image

बघा व्हिडिओ -फलक रेखाटन :बैलपोळा’. दि.१४ सप्टेंबर २०२३

Sep 13, 2023


*’सण मातीचा,इमानी साथीचा…!’*’कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.’
आपल्या भारतीय कृषिप्रधान संस्कृतीतील हजारो वर्षांपासून शेतात शेतकऱ्यांसाठी राब-राब राबणाऱ्या बैलाचा सण म्हणजे बैलपोळा. जगाचा पोशिंदा शेतकऱ्याचा खरा सारथी,मित्र,सखा,सोबती,इमानी सहकारी म्हणजे त्याचा सर्जा-राजा.
आजच्या या सणाच्या दिवशी आपले सर्व शेतकरी या सर्जा-राजाला अंघोळ घालतात, झुल,घंटी,घुंगरू,फुलमाळा, फुगे,रंगांनी नटवून सजवून पुरणपोळीचा गोड नैवद्य खाऊ घालून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुन्हा पुढील वर्षभर आपल्या बैलाच्या साथीने कष्ट करून शेतात सोनं उगवण्याची हिम्मत व प्रेरणा घेऊन अभिमानानं वाटचाल करतात.
अस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्याच्या सर्जा-राजाच्या अविरत परिश्रमाला , विश्वाच्या या पोषणकर्त्या बळीराजाच्या कष्टाला, घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या पिकाला योग्य दाम मिळो हीच या दिवशी एक आशा,,,!!
“इडा पिडा टळू दे , बळीराजाचे राज्य येवू दे…!”
– फलक रेखाटन- देव हिरे (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.