loader image

मनमाड महाविद्यालयात नेतृत्व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Sep 13, 2023


मनमाड ता.13.महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग व करिअर कट्टा अंतर्गत युवक बिरादरी (भारत) प्रस्तुत युवा भूषण, अभिरूप युवा संसद, नेतृत्व प्रशिक्षण साठीची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळे प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा.श्री. प्रशांत वाघाये उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून युवक बिरादरी (भारत) च्या अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण निर्माण होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. अभिरूप युवा संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल व यातून विद्यार्थ्यांना संसदेच्या कामकाजाविषयीची प्रक्रिया याविषयी माहिती मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे यांनी आपल्या मनोगतातून युवक बिरादरी (भारत) च्या अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धाची आवश्यकता व या स्पर्धेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले याप्रसंगी युवक बिरादरी संचालक श्री. प्रसन्न भाऊ पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मिलिंद आहिरे,ज्येष्ठ प्रा. डॉ. आर डी भोसले, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय भूगोल विभागाचे प्रा. डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा.संदीप ढमाले यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.