loader image

सोने व चांदी चे दर उतरले – हे आहेत आज चे दर

Sep 13, 2023


सोने खरेदीदारांसाठी खुशखबर आहे. आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असताना चांदीचे दरही खाली आले आहेत. अशा स्थितीत तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी सोन्याच्या फ्युचर्स किंमतीसह सराफा बाजारातही सोन्याच्या प्रति तोळा दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.जगभरात विशेषतः भारतात सोने हे सर्वात लोकप्रिय गुंतवणूक साधनांपैकी एक असून इतर आर्थिक मालमत्तेप्रमाणे सोन्याच्या किंमतीतही दररोज चढउतार होत असतात. जागतिक मागणी, चलन मूल्ये आणि व्याजदर यासारख्या कारणांमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार होतात. तसेच सोने-चांदीचे भाव दिवसातून दोनवेळा सुधारित होतात, एकवेळा सकाळी आणि दुसऱ्या वेळा संध्याकाळी हे दर बदलतात. सोन्या-चांदीचा आजचा प्रतितोळा भावमल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा भाव सकाळच्या सत्रात ५८ हजार ५५० रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला आणि ५८ हजार ५५६ रुपये इंट्राडे उच्चांक आणि रु. ५८ हजार ५३३ च्या नीचांकी पातळीवर गेला. MCX गोल्ड सोन्याचे ऑक्टोबर फ्युचर्स ०.१५ टक्के घसरणीसह ५८ हजार ५४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत होता तर चांदीचा भाव आज MCX वर ७१ हजार ७५० रुपये प्रति किलोवर खुला झाला. सराफा बाजारातही सोने झाले स्वस्त तर दुसरीकडे, वायदे बाजारातील घसरणीपाठोपाठ देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याचा भाव खाली उतरला आहे. सोन्याच्या प्रति १० ग्रॅम किंमतीत ३०० हुन अधिक घट झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोने ५५००० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९ हजार ४५० रुपयांवर खाली उतरला आहे. त्याचवेळी, चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी चांदीची किंमत कालच्या ७४ हजार ५०० रुपयांच्या तुलनेत आज ७३ हजार ५०० रुपयांवर आले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.