loader image

मनमाड नगर परिषद आणि सरस्वती विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

Sep 14, 2023


मनमाड – (राजेंद्र धिंगाण)स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०२३, माझी वसुंधरा अभियान -४.० अंतर्गत मनमाड नगर परिषद,मनमाड.व सरस्वती विद्यामंदिर मनमाड.यांचे सयुंक्त विद्यमाने मनमाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.शेषराव चौधरी यांच्या अधिपत्याखाली बुधवार दि.१३/९/२०२३ रोजी इको फ्रेंन्डली श्री.गणेश मेकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेस सरस्वती विद्यामंदिर,मनमाड. इयत्ता ९ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनी शाडू माती पासून श्री गणेशाच्या मूर्ती बनविण्यात आल्या.सदर कार्यशाळेत उत्तेजनार्थ विध्यार्थाना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास मनमाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.शेषराव चौधरी, स्वच्छता निरीक्षक श्री.विजय सोनवणे. मलेरिया विभागाचे श्री.तुषार बोराडे, आरोग्य विभागाचे श्री.दिलीप थोरे ,सतीश चावरिया,अतुल शिंदे ,निखील करोसिया, शहर समन्वयक श्रीमती.अर्चना बागुल तसेच सरस्वती विद्यामंदिर चे मुख्याध्यापिका श्रीमती. संजीवनी निकुंभ ,व शाळेचे शिक्षक श्रीमती.योगिता देशपांडे, खैरनार मँडम, नरवडे मँडम, श्री.रत्नपारखी सर व काकडे सर तसेच ८वी व ९वी चे विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग नोंदविला.

 


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.