loader image

भारताच्या एकात्मतेमध्ये राजभाषा हिंदीची भूमिका महत्त्वाची: डॉ. भारती पवार

Sep 15, 2023


 

राष्ट्रीय हिंदी भाषा दिन “हिंदी दिवस” चे औचित्य साधून आज पुण्यात तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा जी,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि मध्यम उद्योग केंद्रीय राज्यमंत्री श्री भानु प्रताप वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले आणि हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि माननीय गृहमंत्री श्री अमित शहा जी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी भाषा हि जागतिक स्तरावर पोहोचली आहे आणि सर्व देशवासियांना आज याचा अभिमान वाटत आहे असे डॉ. भारती पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.कोणत्याही समाजाची प्रगती मातृभाषेच्या उन्नती शिवाय शक्य नाही आणि मनातील वेदना दूर करण्यासाठी भाषा महत्त्वाची आहे तसेच स्वतःच्या भाषेत काम करण्याचा आनंद इतर कोणत्याही भाषेत काम करताना मिळू शकत नाही असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.