loader image

डॉ.सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत के.आर. टी. चे विद्यार्थी चमकले

Sep 15, 2023


जनसेवा फौन्डेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या डॉ.सी.व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे संपन्न झाला. यावेळी मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूलच्या सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक आणि विविध सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

डॉ.सी.व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत चैतन्य डोंगरे या गुणवंत विद्यार्थ्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर रुद्रानी विनोद देशमानकर, प्रणव सुहास जाधव, तन्मय सयाजी गायकवाड, संस्कृती प्रशांत माळी, सार्थक सुनील वाढवणे, प्रथमेश अजय दराडे, श्रेय भीमाशंकर जंगम, सई संतोष झाल्टे, आदित्य अतुल पितृभक्त, प्रसिद्धी चंद्रशेखर दखणे, सई सोमासे, आदित्य राजेश सोनवणे, अवधूत सचिन बिडवे, उत्सव संजय पाटील, आदित्य नितीन सूर्यवंशी, लावण्या हरीकृष्ण पाटील, समर उपाली परदेशी, यश लक्ष्मण चव्हाण, साई चंद्रकांत चिनुके यांनी तालुकास्तरावर यश संपादन केले आहे.

राहुरी येथे संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक आणि विविध सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. प्रतिक पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सचिव डॉ. महानंद माने, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निम्भोरकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना हजर राहण्यासाठी राहुरी दौऱ्याचे नियोजन सौ. संगीता कदम-देसले, श्री. प्रविण आहेर यांनी केले तर श्री. सिद्धार्थ पगारे आणि श्री. विलास कैचे यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.