यावर्षी काही दिवसांपूर्वी सुरवातीला या टोमॅटोला दोन तीन चार पाच हजार रुपये भाव मिळत होता.परंतु सातत्याने दरात घसरण होत असल्याने बळीराजाची आर्थिक कोंडी होत आहे. दोनशे रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज एक ते दिड दोन रुपये किलोने विकला जात आहे.त्यामुळे शेतकरी आस्मानी सुलतानी संकांटामुळे मेटाकुटीला आला असुन राज्य सरकारने व केंद्र सरकारने आणि शासनाने यावर उपाययोजना करुन शेतकरयांना अनुदान द्यावे अन्यथा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही.गेल्या काही दिवसांपासून टमाट्याची लाली कमी झाल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तर शेतकर्यांनी टोमॅटोला कांद्याप्रमाणे 20 रुपये एका किलोला आणुदान घ्यावे. सध्या टोमॅटो ला भाव नसल्याने शेतकर्यांच्या पदरी निराशा येत आहे.जेव्हा भाव वाढले तेव्हा सरकारने नेपाळ मधुन टोमॅटो आयात केले परंतु आता भाव कमी झाले मग सरकारने मदत करायला नको का… बळीराजा ने दुष्काळात टँकर ने पाणी विकत आणले.महागाचे औषधे फवारले बँकेतून व खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन दोन पैसे मिळतील अशी आशा होती पण सगळेच मातीत मिळाले आहे.तोडणीचा खर्च, वाहतूक खर्च, औषधे खर्च, तार बांबू खर्च, खाद,खत, सुतळी, रोप निंदणे, पेपर बेड खर्च बळीराजाला खिशातून पैसे मोजावे लागत आहे.तेजीत सरकार भाव पाडते मग आज मंदित का काही हमीभावाच्य उपाययोजना करीत नाही.सगळ फक्त मतांच्या राजकारणा साठी सुरू आहे पण शेतकर्यांकडे कोणत्याही राजकीय पक्षाला आमदार खासदार मंत्री यांना बघण्यासाठी वेळ नाही हेच बळीराजा चे दुर्दैव आहे. टमाट्याला जबरदस्त भाव मिळताच सरकारने हस्तक्षेप करत तत्काळ नेपाळ वरुन टोमॅटो आयतीचा निर्णय घेतला या निर्णयामुळे रातोरात टोमॅटो चे भाव कोसळले.आज टोमॅटो दोन रुपये किलो रुपये दराने विक्री होत आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांनी मोठ्या आशेने टोमॅटो पिकाची लागवड केली आहे.नाशिक जिल्ह्यातील कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकर्यांचा केंद्र व राज्य सरकारवर रोष वाढला आहे.त्याचे परिणाम आगामी निवडणुकांत दिसून येतील.शेतकर्याला लागवडीचा खर्च देखील वसुल होणे मुश्किल असल्याने बळीराजा संतप्त झाला आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा हे फक्त नावालाच आहेत.कृषीप्रधान म्हणवणाऱ्या देशात शेतकर्यांच्या इतक्या हाल अपेष्टा सुरू आसतांना शेतकर्यांना अच्छे दिन येणार कधी अशी चिंता सध्या बळीराजा ला आहे.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...








