loader image

रोटरी महिला क्लब मनमाड व जय हिंद कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंध बांधवांना उपयोगी वस्तूंचे वाटप

Sep 16, 2023


मनमाड – जय हिंद अंध कल्याणकारी संस्था ही अंध बांधवांसाठी काम करणारी संस्था असून अंध बांधवांच्या हितासाठी तसेच त्यांचे एकत्रिकरण करण्यासाठी समाजात काम करत आहे . मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालय येथे
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ह्या संस्थेने अंध शिक्षकांना त्यांच्या उपयोगी आणि गरजू वस्तू समाजातील सामाजिक संस्था यांच्या कडून उपलब्ध करून दिल्या .
मनमाड येथील रोटरी महिला क्लब यांचे वतीने ह्या अंध शिक्षकांसाठी काठ्या (ब्लाइंड स्टिक ) उपलब्ध करून देण्यात आल्या . तसेच रोटरी क्लब चे ज्येष्ठ सदस्य श्री. डी. बी. सदगिर यांचे तर्फे अंध संस्थेस देणगी देण्यात आली
ह्या उपक्रमासाठी रोटरी महिला क्लब च्या अध्यक्षा सौ. सेनोरिटा सूर्यवंशी तसेच ह्या प्रोजेक्ट चे चेअरमन सौ. मयुरी काकडे महिला क्लब च्या ज्येष्ठ सदस्य सौ. चित्रा काकु गुजराथी , सौ. रवींद्र कौर कांत , सौ. सुलभा काकडे , सौ. लीला सदगिर, सौ. पौर्णिमा माने , सौ. यादव
तसेच रोटरी चे सदस्य उपस्थित होते . ह्या कार्यक्रमासाठी मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालय यांचे तसेच मनमाड गुरुद्वारा यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय हिंद अंध कल्याणकरी संस्थेचे पदाधिकारी तसेच रोटरी सदस्य यांनी मेहेनत घेतली.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.