मनमाड – जय हिंद अंध कल्याणकारी संस्था ही अंध बांधवांसाठी काम करणारी संस्था असून अंध बांधवांच्या हितासाठी तसेच त्यांचे एकत्रिकरण करण्यासाठी समाजात काम करत आहे . मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालय येथे
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ह्या संस्थेने अंध शिक्षकांना त्यांच्या उपयोगी आणि गरजू वस्तू समाजातील सामाजिक संस्था यांच्या कडून उपलब्ध करून दिल्या .
मनमाड येथील रोटरी महिला क्लब यांचे वतीने ह्या अंध शिक्षकांसाठी काठ्या (ब्लाइंड स्टिक ) उपलब्ध करून देण्यात आल्या . तसेच रोटरी क्लब चे ज्येष्ठ सदस्य श्री. डी. बी. सदगिर यांचे तर्फे अंध संस्थेस देणगी देण्यात आली
ह्या उपक्रमासाठी रोटरी महिला क्लब च्या अध्यक्षा सौ. सेनोरिटा सूर्यवंशी तसेच ह्या प्रोजेक्ट चे चेअरमन सौ. मयुरी काकडे महिला क्लब च्या ज्येष्ठ सदस्य सौ. चित्रा काकु गुजराथी , सौ. रवींद्र कौर कांत , सौ. सुलभा काकडे , सौ. लीला सदगिर, सौ. पौर्णिमा माने , सौ. यादव
तसेच रोटरी चे सदस्य उपस्थित होते . ह्या कार्यक्रमासाठी मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालय यांचे तसेच मनमाड गुरुद्वारा यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय हिंद अंध कल्याणकरी संस्थेचे पदाधिकारी तसेच रोटरी सदस्य यांनी मेहेनत घेतली.











