राष्ट्रीय पोषण माह २०२३ अंतर्गत १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी उल्हासनगर अधिनस्त सर्व २१७ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह २०२३ साजरा केला जात आहे..सदर कालावधीत सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत “या मुळ थीमवर आधारित एकूण ७ थीमवर भर देवून विविध ९० प्रकारच्या उपक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे..या वर्षीच्या थीम मधील उपक्रमांमध्ये, भरड धान्याचा आहारात वापर, पालेभाज्या, रानभाज्यांचा वापर, पोषणाची पंचसुत्री, सात अन्न गट, अॕनिमिया प्रतिबंध उपचार व मार्गदर्शन, स्थानिक पाककृतींचे रोजच्या आहारातील महत्व, योगाचे महत्व, मेरी माटी-मेरा देश, बाळाचे पहिले एक हजार दिवस, स्तनपानाचे महत्व,पोषण भी..पढाई भी.. मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, बाल विवाह रोखणे इ. बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे..या पोषण माहची प्रभावी जनजागृती करण्यासाठी १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत प्रकल्प कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे..यासाठी अंगणवाडी केंद्रांना दैनंदिन वेळापत्रक देण्यात आले आहे..सर्व भागांमध्ये रॕलीचे आयोजन केले आहे..मुक्त संवाद, चर्चासत्र, नुक्कड नाटक, पाककृती प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, प्रश्न मंजुषा,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,आशा सेविका,अंगणवाडी मदतनिस ((AAAA) यांच्या संयुक्त गृहभेटी इ.द्वारे कुटुंबांना योग्य पोषणाचे महत्व पटवून दिले जात आहे..यामध्ये अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात अंगणवाडी सेविका,मदतनिस महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, फाऊंडेशन फाॕर मदर अॕण्ड चाईल्ड हेल्थ स्वयंसेवी संस्था यांचाही सक्रिय सहभाग आहे..पोषणाचे योग्य संदेश मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचावे..यासाठी आठवडे बाजार, रेल्वे स्टेशन, शाळा, काॕलेज, इतर गर्दीची ठिकाणे इ. सह सोशल मिडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.. .सही पोषण..देश रोशन हे पोषण अभियानाचे मुळ घोषवाक्य आहे.. हा पोषण माह २०२३ हर घर पोषण त्योहार या पद्धतीने लोक सहभागातून राबविला जात असुन याला उत्सवाचे स्वरुप असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांनी सांगितले..या पोषण माह च्या यशस्वीतेसाठी विजया कुंभार, शोभा चौगुले, श्रुतिका मोहिते, सुषमा केणी, ज्योती सोनवणे या मुख्यसेविका सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना मार्गदर्शन करत आहेत.

राशी भविष्य : १५ एप्रिल २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....