दिनांक.16 सप्टेंबर- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. एस. एन. निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभाग व भूगोल अभ्यास मंडळ एम.जी.विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. निकम सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेत आणि त्यासाठी आपण ओझोन वायूचे संवर्धन केले तरच पृथ्वीचे संरक्षण होऊ शकते. तसेच हवामान बदल, जागतिक तापमान वाढ समुद्रातील पाण्याच्या पातळीत भविष्यात होणारी वाढ याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. गणेश गांगुर्डे यांनी याप्रसंगी पीपीटीव्दारे विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक देविदास सोनवणे यांनी करतांना ओझोन वायूचा क्षय व जागतिक तापमान वाढ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका विजया सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भूगोल विभागातील प्राध्यापक लेफ्टनंट प्रकाश बर्डे यांनी केले तसेच प्राध्यापक जनार्दन गावित यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...









