मनमाड – भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी मनमाड भाजपचे नारायण पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शिवसेना कार्यालय येथे नारायण पवार यांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. त्यांची नुकतीच भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.
या प्रसंगी अल्ताफ(बाबा) खान उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगें, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे ,शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, सरपंच राजाभाऊ पवार, किशोर लहाने, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,लाला नागरे,अंजू शेख,स्वराज देशमुख,पिंटू वाघ,बाबा पठाण, महिंद्र गरुड, देवद्रा घटे, सचिन दरगुडे,प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.









