आज पासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र धूम असून प्रत्येक जण आपापल्या परीने आरास करण्याचे प्रयत्न करत असतो. कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील पुत्तेनाहली येथील सत्यसाई गणेश मंदिरात चलनी नोटा आणि नाणे वापरात आकर्षक सजावट करण्यात आली असून ती दिसताक्षणीच अतिशय सुंदर दिसत आहे. ह्या सजावटीसाठी तब्बल दोन कोटी पेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची नाणी वापरण्यात आली आहे. या मध्ये १०,२०,५०,१००,२०० आणि ५०० च्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.


