मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरातील श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीची स्थापना मिरवणुक पालखीतून सकाळी मिरवणुकीची 27 वर्षा ची परंपरा अखंडित ठेवत काढण्यात आली. मनमाड शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्या आणि आम्ही परंपरा पाळतो.. आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो हे ब्रीदवाक्य घेवून काम करणार्या श्री निलमणी गणेश मंडळातर्फे यंदा ही सन 1997 पासून सलग 27 व्या वर्षी या स्थापना मिरवणुकीचे आयोजन सकाळी करण्यात आले होते यंदा मनमाड शहराच्या नूतन गाव प्रवेशद्वार (वेश) चे नूतनीकरणाचे (जीर्णोद्धार) चे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे त्यामूळे या नवीन वेशीतून प्रथम मिरवणुक नेण्याचा श्री नीलमणी च्या मानाच्या पालखीला मिळाला या मानाच्या पालखी मिरवणुकीचा आरंभ श्री निलमणी गणेश मंडळा चे जेष्ठ सदस्य रामदास इप्पर यांनी श्रीफळ वाढवून केला. संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणार्या या मिरवणुकीत मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी, तसेच पालखीच्या समोर चंद्र सूर्य व भगवा ध्वज (मानाची अब्दागिरी), सनई चौघडा व वाद्यवृंद लावण्यात आले होतेे. मिरवणुकीत शंखनादासह गणपती आगमनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. मनमाड शहरात श्री निलमणीच्या पालखी स्थापना मिरवणुकीचा शुभारंभ झाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांमध्ये मिरवणुक निघून स्थापना करण्यात येते. मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीचे स्वागत करण्यात आले आणि सुवासिंनीद्वारे औक्षण करण्यात आले. मिरवणुकीमध्ये खडी साखरेचा/मोदकाचा महाप्रसाद सर्व भाविकांना मिरवणुकीत वाटण्यात आला. मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात श्री निलमणी गणेश मंडळाचे सदस्य सौ व श्री आनंद गांगुर्डे (शिंपी )यांच्या हस्ते पार्थीव मुर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. या स्थापना मिरवणुकीत श्री निलमणी गणेश सार्वजनिक ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष, किशोर गुजराथी, सचिव नितिन पांडे,विश्वस्त शेखर पांगुळ, गोविंद रसाळ प्रज्ञेश खांदाट, कृष्णा शिंपी,संदीप सिनकर, रोहित कुलकर्णी, भरत छाबडा अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त ,राहुल लांबोळे , संतोष बळीद, क्रांती आव्हाड चंद्रकांत परब,सतीश शेकदार ,अथर्व गुजराथी, सौरभ मुनोत, प्रतिक पांगुळ, अक्षय छाबडा, दिक्षा पांगुळ, जागृती आहेर, निकीता ढासे, किशोर आव्हाड, किशोर शर्मा, दिपक शिंदे नीलकंठ त्रिभुवन, ,योगेश देशपांडे,राजेश नीकुंभ अनंता कुळकर्णी, मनोज छाबडा योगेश म्हस्के राजाभाऊ गुप्ता यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. या मिरवणुकीत श्री मोरया वाद्यवृंद पारंपारिक पध्दतीने श्री निलमणी गणेश च्या पालखी सन्मुख वादनाची प्रात्यक्षिके सादर केली. दहा दिवस निलमणी गणेश मंदीरात सकाळी महा अभिषेक /रात्री महा आरती सह भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तर ट्रस्ट तर्फे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत सलग 07 वर्षी शिल्लक औषध संकलन उपक्रम या उत्सव काळात राबविण्यात येणार आहे पालखी मिरवणुकीचे नियोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केले.तर मनमाड शहर पोलिस स्टेशन च्या वतीने पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन मध्ये पालखी मिरवणुकी दरम्यान चोख बंदोवस्त ठेवण्यात आला होता.










