बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक अंगणवाडी क्र.७५. जमधाडे चौक.मनमाड विभाग.येथे श्री.चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या राष्ट्रीय पोषण माह १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत अंगणवाडी कार्यक्षेत्रातील लाभार्थींना गृहभेटीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येत आहे. अंगणवाडी क्र.७५.मनमाड येथे AAAAच्या माध्यमातुन गरोदर महिला, स्तनदा माता,कुपोषित बालकांच्या घरी,किशोरी इतर ही पालक वर्ग यांना आहार, आरोग्य, स्वच्छता लसिकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोषण अभियानातील विविध थिमच्या माध्यमातुन जनजागृती करुन पोषणाच्या वर्तनात योग्य तो बदल घडवुन आणण्याबाबत मार्गदर्शन केले.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...








