loader image
[ays_poll id=7]

भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात श्रीसत्य विनायक महापूजा व सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

Sep 23, 2023


मनमाड – आम्ही परंपरा पाळतो… ❗ आम्ही संस्कृती चे रक्षण करतो…. ❗ हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सव 2023निमित्ताने मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री नीलमणी मंदिरात सलग २७ व्या वर्षी रविवार दिनांक २४/९/२०२३ रोजी सकाळी ठीक ९ वाजता श्री सत्य विनायक महापूजा तसेच यंदाही सलग ९ व्या वर्षी रविवार दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री निलमणी महागणपतीस छप्पन महाभोग (महानैवेद्य) अर्पण करण्याच्या या महत्व पूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी धार्मिक परंपरा असणार्‍या श्री सत्य विनायक महापूजा व छपन्न महाभोग (महानैवेद्य) या कार्यक्रमामध्ये सर्व गणेशभक्तांनी स्वतःच्या घरी तयार केलेले (कांदा लसूण, वांग यांचा वापर नसलेले )सर्व प्रकारचे नैवेद्य आज सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मंदीरात घेवून यावे आणि आणि या महाप्रसादाच्या लाभ घेणे साठी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

 


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.