बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५. जमधाडे चौक मनमाड विभाग येथे श्री.चद्रंशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात पोषण अभियानातील विविध थीमची जनजागृती करण्यात आली. स्वच्छता ,अतिसार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.अस्वच्छ दुषित पाण्याच्या प्रार्दुभावामुळे,,बाहेरील उघडे अन्नपदार्थ खाल्यामुळे अतिसाराची लागण होते.ही लागण झाल्यावर प्रथोमोपचार म्हणुन मीठ, साखर,पाण्याचे मिश्रण द्यायचे आहे.अतीसारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे भरपुर पाणी प्यायचे आहे..दवाखान्यात जावुन औषधौपचार करायचे आहे.स्वच्छ पाण्याचा वापर ,घरातील ताजे अन्नपदार्थच खायचे आहे.”पोषण भी,पढाई भी”या थीमनुसार सर्वानी आहारात विविधता ठेवायची आहे.पौष्टीक आहार आणि घरातले ताजे अन्नपदार्थ खायचे आहे.सोबतच शिक्षणही महत्वाचे आहे..बालकांच्यां विकासास निगडीत गरजा ओळखुन त्यांना तसे अनुभव देवुन त्याच्यां सर्वागिंण विकासास चालना द्यायची आहे. कारण बालकांच्या पोषणासोबत शिक्षणदेखिल तितकेच महत्वाचे आहे.














