येथील के आर टी हायस्कूल जुनियर कॉलेजमध्ये गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पाची उत्तर पूजा विधी करण्यात आली. श्री सचिन सांगळे व सौ अनिता सांगळे यांच्या हस्ते उत्तर पूजा करण्यात आली. उत्तर पूजेचे मंत्रविधी श्री. सुधाकर निंभोरकर बाबा यांनी पार पाडले . त्यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर व शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती बाप्पाची मिरवणूक शाळेपासून वाजत गाजत गणेश कुंडापर्यंत नेण्यात आली. आणि बाप्पांचे गणेश कुंडामध्ये विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.













