loader image

नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव कोंडी कायम

Oct 1, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नाशिक जिल्हातील कांदा लिलावाची कोडीं कायम असून आज व्यापारी असोशिएशनच्या पिपंळगाव येथे झालेल्या बैठकीत व्यापारी वर्गाने एकमुखाने बंदचा निर्णय कायम केला.
याबाबत अधिक माहीती अशी की आज पिंपळगाव बसवंत येथे कांदा व्यापारी वर्गाची कोर कमेटीची बेंठक पार पडली. यामध्ये जिल्हातील सर्व बाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक बाजार समितिच्या व्यापारी प्रतिनिधीनी आपली भुमीका मांडली व जोपर्यत आपल्या मागण्या सरकार मान्य करीत नाही. तो पर्यंत आपला बंद हा कायम राहील असे सर्वानुमते ठरले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खंडूशेट देवरे होते . यावेळी नंदूशेट डागा ‘ विजूशेट बाफणा ‘ सुनील देवरे ‘ ऋषीकेश सांगळे ‘ दिपक गोसावी ‘ नितीन जैन ‘ प्रविण कदम ‘ अतूल गाडे यांनी बैठकीला मार्गदर्शन केले.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारने आमची एकही मागणी मान्य केलेली नाही सरकारकडून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत व्यापाऱ्यांचा बंद कायम राहणार असल्याची माहिती कांदा व्यापारी असोसिएशनचे प्रवक्ते प्रवीण कदम यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले की, कांदा व्यापारी असोसिएशनचा खासगी कांदा मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न आहे. व्यापारी लवकरच खासगी कांदा मार्केट सुरू करणार आहे. नाफेडच्या माध्यमातून कांद्याचे दर पाडून शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं सरकारचं षडयंत्र आहे. मात्र त्याच खापर मात्र व्यापाऱ्यांच्या माथी फोडलं जात आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या तर लिलाव सुरू करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.


यावेळी ते म्हणाले की, सरकार व्यापाऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. विंचूरमध्ये काही व्यापाऱ्यांवर दबाव टाकून कांदा लिलाव सुरू केले गेले असेही ते म्हणाले.

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झाले आहे. या बैठकीला पिंपळगाव ‘ निफाड ‘ विचूंर ‘ उमराणे ‘ लासलगाव ‘ देवळा ‘ मालेगाव ‘ सटाणा ‘ नामपूर ‘ कळवण ‘ मुंगसे ‘ मनमाड ‘ वणी . कोपरगाव नांदगाव ‘ बोलठाण येथील व्यापारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.