मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व* *शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेतील उपशिक्षक सैय्यद साजिद अ. गफूर, उपशिक्षिका सविता सचिन कराड, आरती दखने यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यांची माहिती दिली. शाळेचे उपशिक्षिक सैय्यद साजिद अ.गफुर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...












