मनमाड:- नाशिक येथे मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलचा संघ उपविजेता ठरला आहे.
नाशिक जिल्यातील नामांकित शाळेचे सहभागी झालेले संघ दिल्ली पब्लिक स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल , फ्रावशी अकॅडेमी, इबिनेझर इंटरनॅशनल स्कूल, अशोका युनिव्हर्सल स्कूल, विसडम इंटरनॅशनल स्कूल, देवळाली पब्लिक स्कूल, दौलती पब्लिक स्कूल, इ. संघ जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होते.
मनमाड येथील गुड शेफर्ड स्कुलच्या खेळाडूंनी बास्केटबॉल स्पर्धेत सर्व सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात अत्यंत चुरशिच्या लढतीत संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
संघाला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री. व्यंकटेश देशपांडे सर व श्री. रिसम परविंदर ( लकी सर) यांनी केले. संघ व्यवस्थापक म्हणून श्रीकांत देवचित्ते सर आणि सीमा गरुड मॅडम हे होते.
संस्थेचे संचालक मंडळ, गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...








