loader image

नाशिक जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा संघ उपविजेता

Oct 4, 2023


मनमाड:- नाशिक येथे मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलचा संघ उपविजेता ठरला आहे.
नाशिक जिल्यातील नामांकित शाळेचे सहभागी झालेले संघ दिल्ली पब्लिक स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल , फ्रावशी अकॅडेमी, इबिनेझर इंटरनॅशनल स्कूल, अशोका युनिव्हर्सल स्कूल, विसडम इंटरनॅशनल स्कूल, देवळाली पब्लिक स्कूल, दौलती पब्लिक स्कूल, इ.‌ संघ जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होते.
मनमाड येथील गुड शेफर्ड स्कुलच्या खेळाडूंनी बास्केटबॉल स्पर्धेत सर्व सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात अत्यंत चुरशिच्या लढतीत संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
संघाला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री. व्यंकटेश देशपांडे सर व श्री. रिसम परविंदर ( लकी सर) यांनी केले. संघ व्यवस्थापक म्हणून श्रीकांत देवचित्ते सर आणि सीमा गरुड मॅडम हे होते.
संस्थेचे संचालक मंडळ, गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.