loader image

अवकाळी गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, मांडवड येथील शेतकऱ्यांचे उपोषण

Oct 4, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदग़ाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी सन २०२२ झालेल्या अवकाळी गारपीट च्या नुकसान भरपाई साठी दिनांक ३ ऑक्टोबर २०२३रोजी मांडवड येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषणास बसले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की मनमाड मार्केट कमिटीचे संचालक श्री विठ्ठल आबा आहेर यांच्या नेतृत्वाखाली मांडवड येथील शेतकरी दत्तूभाऊ थेटे शरदआबा काजळे व बंडू थेटे यांनी जनतेला २०२२ मध्ये झालेल्या अवकाळी गारपिटीचा व झालेला नुकसान भरपाईचा शासनाने भरपाई द्यावी यासाठी वेळोवेळी तहसील कृषी खाते व पंचायत समिती यांच्याशी पाठपुरावा करून जाण करून दिली परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी उडवा उडवी चे उत्तर देऊन प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली त्या निषेधार्थ मांडवड गावातील ग्रामस्थ अशोक निकम ‘ उमाकांत थेटे ‘ वि. का . सेवा सोसायटीचे चेअरमन सुशील आंबेकर ‘ दत्तात्रय निकम ‘ अनंतभैय्या आहेर ‘सरपंच अंकुश डोळे ‘गंगाराम थेटे ‘महेश मोहिते ‘ सुधीर काजळे ‘सागर गडाख ‘ विजय आहेर ‘ शंकरराव थेटे ‘ वाल्मीक थेटे ‘माजी सरपंच बाळासाहेब आहेर ‘संजय निकम ‘ सोमनाथ नाझरकर ‘सुबोध थेटे। ‘ प्रमोद कदम ‘माधवराव गडाख ‘ रमेश आहेर ‘रामसिंग पिंगळे या सह सर्व स्थानिक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन उपोषणाचा मार्ग अवलंबवला . त्या उपोषणास माजी आमदार मनमाड मार्केट कमिटीचे सभापती श्री संजय पवार यांनी भेट दिली . तदनंतर नांदगाव तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री सिद्धार्थ मोरे साहेब यांनी उपोषणार्थी ची भेट घेवून संबधीत सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या डाटा सादर करण्याचा कडक सूचना दिल्या.
अतिवृष्टी व गारपीट होऊन सात महिने झाले तरी अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यातच चालू वर्षी पावसाळा नाही जे पेरले होते ते उगवलेच नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जनावरानां चारापाणी नाही हाताला काम नाही . गेल्या सात महिन्यापासून मांडवडचे शेतकरी तहसिल कार्यालयात हेलपाटे मारीत आहे.
यावेळी उपोषण कर्ते विठ्ठल ( आबा) आहेर यांनी सांगितले की जो पर्यंत अनुदान बॅक खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील.

प्रतिक्रिया

मांडवड गावातील शेतकऱ्यांचे आधार व्हेरीफिकेशन करायचे चे काम सुरू आहे. आधार व्हेरीफिकेशन करून अपलोड होताच त्यांना मदत देता येईल.

डॉ. सिद्वार्थकुमार मोरे तहसिलदार नांदगाव

गारपीट मुळे नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या चार कर्मचारी पैकी एक कर्मचारी यांनी याद्या तयार करुन ५०२ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. पण तीन कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून याद्या न टाकल्याने आम्हास अनुदाना पासून वंचीत रहावे लागले या संर्दभात वेळोवेळी निवेदने दिली असून संबधीत कार्यालयाने वेळ मागून घेतली पण अनुदान काही मिळाले नाही त्यामुळे आम्हास नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागले.
विठ्ठल( आबा) आहेर
उपोषण कर्ते शेतकरी .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.