महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘वन्यजीव सप्ताह 2023’ निमित्त ‘ पक्ष्यांचे संरक्षण ‘ या विषयावर पक्षी निरीक्षक प्रा. विक्रम पाटील यांचे व्याख्यान दूरदृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आले. त्यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की, आज पाणथळ संपत चालले आहेत त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर येथील अनेक पक्ष्यांच्या नोंदी विषयी त्यांनी माहिती दिली, तसेच रात्री असलेला दिव्यांचा झगमगाट हा रात्री संचार करणाऱ्या पक्ष्यांच्या अधिवासाला धोका पोहोचवतात हे त्यांनी लक्षात आणून दिले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी संरक्षित जंगल, जीवसृष्टी व मानव सहजीवन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे. डी. वसईत तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. पी बी परदेशी यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, विद्यार्थी उपस्थित होते.









