मनमाड – आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेतील साई क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. श्री. रवींद्र राजपूत व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम राजपूत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. साई क्लासेसच्या ६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यापैकी ४५ विद्यार्थ्यांना विनर, ११ विद्यार्थ्यांना फर्स्ट रनर अप, तर ४ विद्यार्थ्यांना सेकंड रनर अप पारितोषिक मिळाले. तसेच साई क्लासेस ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पारितोषिक कु. साची जाधव या विद्यार्थिनीला देण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर रवींद्र राजपूत यांनी साई क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सौ पुनम राजपूत यांनी क्लासच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री प्रवीण मोरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन क्लासेसच्या संचालिका सौ. हर्षा मोरे व सौ. वृषाली पांडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...








