loader image

जिल्हास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Oct 19, 2023

मनमाड — शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हा पातळीवर खेळविण्यात आलेल्या विविध मैदानी स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. चौदा वर्षे वयोगटात योगासन स्पर्धेत साई योगेश डिंबर या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला. त्याची शहादा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तसेच मिनाबाई ठाकरे स्टेडियम विभागीय संकुल येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत शुभम भिम बेहाडे याची 14 वर्षे वयोगटात 100 मीटर व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. त्याची विभागीय स्तरावर निवड झाली. कृष्णा घाडगे याचा 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. सुधाकर कातकडे, श्री. दत्तू जाधव ,श्री. स्वप्निल बाकळे यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम, माननीय पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर लॉईड आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.