नांदगाव शहरात शिवसेना रिक्षा युनियन, चालक मालक संघटना व माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
आज नांदगाव शहरात शिवसेना व आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कार्याची प्रेरणा घेत शिवसेना रिक्षा युनियन, चालक मालक संघटना व माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन संपन्न झाले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांचे या प्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली तर मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
या वेळी बोलताना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शाखा उद्घाटन झालेल्या सर्व संघटनांच्या सदस्यांचा विमा उतरवून देणार असल्याचे सांगितले, या माध्यमातून प्रत्येकाला हॉस्पिटल खर्च 5 लाख व काही अप्रिय घटना घडल्यास वारसास 15 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी स्वखर्चातून सुसज्ज शेड केबिन देण्यात आली असून सौ. अंजुम ताई कांदे यांनी वॉटर फिल्टर भेट दिले आहे.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख सुनील जाधव, राजाभाऊ जगताप, नंदू पाटील, राजाभाऊ देशमुख, बापूसाहेब जाधव, शशिकांत सोनवणे, अय्याज शेख, दिनेश ओचाणी, संजय देवरे, हरिभाऊ नन्नवरे, सुधीर देशमुख, किशोर जाधव, नाना पेहरे, संतोष वाघ, नितीन जाधव, अमजद खान, अनिल पगारे, योगेश गायकवाड, दत्तात्रय सावंत, सतीश गांगुर्डे, अब्दुल सत्तार, सुनील आहेर, भगीरथ जेजूरकर,
आदि उपस्थित होते.












