भारतात खेळवली जाणारी विश्वचषक स्पर्धा आता प्रत्येक दिवसागणिक व सामन्यागणिक रंगतदार होते आहे. शुक्रवारच्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात ऑस्ट्रेलिया 400 ते 450 धावा कुटणार असे चित्र असताना पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने जीव तोडून गोलंदाजी टाकत पाकिस्तानची लाज राखली व 370 च्या आत कांगारूना रोखले. पाकिस्तान हा सामना हरला पण शाहीन शेवटी शेवटी का होईना पण भाव खाऊन गेला, अन्यथा पाकिस्तानला हा पराभव अधिक जिव्हारी लागला असता.. आता रविवारी भारताचा मुकाबला बलाढ्य न्यूझीलंड शी होतो आहे..हिट मॅन रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अद्याप पर्यंत तरी विश्वचषक स्पर्धेत दृष्ट लागण्या सारखी कामगिरी करतोय. आतापर्यंत सर्व सामने जिंकून भारतीय संघ विजेता ठरला आहे. ही यशाची परंपरा राखण्यासाठी भारताला न्यूझीलंड ला शिकस्त द्यावी लागेल. भारत व न्यूझीलंड च्या लढतीत भारताने न्यूझीलंड संघाचे अति दडपण घेऊन चालणार नाही. भारत या किंवीं विरोधात कायम दबावाखाली खेळतो , न्यूझीलंड च्या बोल्ट,हेनरी, फर्ग्युसन या तोफ खान्याला भारतीय फलंदाजांनी झुंजारपणे सामोरे जायला हवे. न्यूझीलंड संघाचा फिरकी मारा भारतीय खेळपट्ट्यांवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवतो आहे. आमच्या रोहित,विराट, शुभमन, राहुल या फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्याची खरी गरज आहे
तसे पाहिले तर भारतापेक्षा न्यूझीलंडचे पारडे भारतापेक्षा जड
दिसते,मात्र भारतीयांनी बलाढ्य न्यूझीलंड ला हरविण्याची जिगर दाखवून रविवारच्या सामन्यात झुंजार खेळ करण्याची गरज आहे. न्यूझीलंड विरुद्ध खेळताना भारतीय फलंदाजी ढेपाळते तसेच न्यूझीलंड चा कोणताही अष्टपैलू खेळाडू येतो, व भारताच्या तोंडचा घास हिरावून घेतो, किंवीं चे वळवळणारे शेपूट भारताला महागात पडते, हा आजवरचा इतिहास आहे, रोहित च्या भारतीय संघाला हा इतिहास पुसून काढावा लागेल. भारताला काही चुका दुरुस्त कराव्या लागतील. जबाबदारीने खेळणारे आमचे फलंदाज अचानक संयम सोडून आततायीपणा करतात. परिणामी अपेक्षीत धावसंख्या आकाराला येणे अवघड ठरते, हे लक्षात घेऊन फलंदाजांनी न्यूझीलंड च्या गोलंदाजांचा मुकाबला केला पाहिजे. आमच्या शेवटच्या खेळाडूंनी देखील अष्टपैलूंत्व दाखवत वेळप्रसंगी फटकेबाजी करणे, तेवढेच महत्वाचे आहे. न्यूझीलंड चे क्षेत्ररक्षण ही त्यांची जमेची बाजू आहे. भारतीयांना सुद्धा न्यूझीलंड ला कमीतकमी धावात रोखण्यासाठी उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण करावे लागेल. रविवारची भारताची लढत खेळाडूंची सत्व परीक्षा पाहणारी आहे, बलाढ्य किंवीं ना भारताने हरवणे ही करोडो चाहत्यांची इच्छा आहे. तेव्हा जिगरबाज पद्धतीने, मोठ्या हिमतीने रोहित च्या टीम ने या विश्वचषक स्पर्धेतील आपले वर्चस्व व कामगिरी टिकवून ठेवत आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंड ला चित करावे . या क्षणाची सारे आतुरतेने वाट पहात आहेत.

नाशिक जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...