loader image

कांदा उत्पादक शेतकऱ्यावर केंद्राचा अन्याय निर्यात मुल्य क्विंटला ८०० अमेरीकन डॉलर

Oct 29, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

केद्रं सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय केला असून कांदा निर्यातीचा दर ८०० अमेरीकन डॉलर केला असून यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर ऐन सदासुदीच्या काळात अन्याय झाल्याने या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने जाहीर निषेध केला .

राजस्थान,मध्यप्रदेश सह पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असताना त्यात देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्हासह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होत घाऊक बाजारात कांदा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर जाताच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने देशांतर्गत कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यात मूल्य डॉलर मध्ये वाढ करत प्रति मेट्रिक टन ८०० डॉलर ३१ डिसेंबर पर्यंत केल्याने या अघोषित निर्यात बंदीमुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडणार आहे

देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या बारा दिवसांमध्ये नाशिक जिल्हातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये कांद्याच्या दर दुप्पट झाल्याने व ऑक्टोबर च्या दुसऱ्या सप्ताहात २२०० ते २५०० रुपये मिळणारे बाजार भाव शेवटच्या सप्ताहात ५५०० ते ५८०० रुपयांपर्यंत गेल्याने केंद्र सरकार खडबडून जागे होत नाफेड एनसीसीएफ च्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉक मधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा २५रुपये किलो दराने बाजारात विक्री करण्याच्या निर्णयाला २४ तास उलटत नाही तोच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढत कांद्याच्या निर्यात शुल्क दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेत ४०० डॉलर ववरून ८०० डॉलर केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

या अगोदर केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात शुल्क वाढ करत ४० टक्के केले बाजार समित्या बंद ठेवून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला होता आता कांदा निर्यात मूल्य दरामध्ये ८०० डॉलर प्रति मॅट्रिक टन केल्याने कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयाविरुद्ध काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागेल आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.