मनमाड – नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे नांदगाव येथे आज दिनांक 03/11/2023 रोजी चेंज ओवर कार्यरत असताना न एक जे. एन. पी. टी मालगाडी कि.मी 286/ 10-12 अप गुड्स नबर 1 येथून दुपारी 03.05 मिनिटांनी जात असताना ती एक साईड ने ड्रील होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कनिष्ठ अभियंता (क. वि) संदीपकुमार रमेश पाटील यांना कळविले.पाटील यांनी तातडीने हे DY.SS NGN यांना घटनेचे गांभीर्य सांगून जे. एन. पी. टी मालगाडी च्या चालकास गाडी थांबवन्यास सांगितले व होणारा मोठा अपघात वाचवला असून रेल्वे विभागाची होणारी आर्थिक आणि मनुष्य हानी होण्या पासून रक्षण केले आहे.




