मनमाड – नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून तालुक्यातील नागरिक, माताभगिनी, शेतकरी, शेतीवर काम करणारे हातमजुर, व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. सर्वत्र शेतजमीनी ओसाड पडल्या आहेत, विहिरु व बोअरींगने तळ गाठला आहे त्यामुळे फक्त शेतीच नव्हे तर जनावरांना देखील पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना बाहेरगावहून मोठ्या प्रमाणात चारा विकत आणावा लागत आहे. नांदगाव तालुक्यातील माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नांदगाव तालुक्यातील सद्य परिस्थिती गंभीर असतानाही व तालुक्याबाबत दखल घेतली जात नाही, विविध स्तरावर आंदोलने करण्यात आली तरीही शासन नांदगाव तालुक्याकडे लक्ष देण्यास तयार नाही तसच आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव व धनगर बांधव, भगिनी, वयोवृध्द तसेच परिवारासह आरक्षणसाठी व मुलभूत हक्कासाठी शासन दरबारी अगदी संयमाने मागणे मागत आहे. आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, राज्यात सर्वत्र साखळी उपोषणे चालू असून अन्नत्याग, मुंडन अशी आंदोलने होत आहेत. आरक्षण प्रश्र्नी त्वरित दखल घेवून न्यायद द्यावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प क्षाच्या वतीने शासनास करण्यात आली आहे. राज्यातील सदर गंभीर परिस्थितीबाबत शासनाला जाग आणण्यासाठी नांदगाव तालुक्यातील सर्वच , शेतकरीबांधव, माताभगिनी यांच्या वतीने शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकरी यांनी आज नांदगाव येथे मोर्चा काढून सदर मागणी केली आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या उपस्थितीत आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

राशी भविष्य : ०७ ऑक्टोबर २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....