नांदगांव : मारुती जगधने
आमदार सुहास कांदे नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर होण्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
आज मुंबई येथे मदत व पुनर्वसन विभागाची दुष्काळ परिस्थितीवर बैठक संपन्न झाली याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांना नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली व निवेदन दिले
मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील साहेब यांनी नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. संबंधित अधिकाऱ्यांना समावेश करण्याबाबत निर्देश दिले.
मनमाड शहरात भाजपा चा 45 वा वर्धापन दिन (स्थापना दिन ) साजरा
विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भा -ज -पा चा 45 वा वर्धापन दिन ( स्थापना दिन )...









