loader image

मुकुंद आहेर ची भारतीय रेल्वे मध्ये गुणवंत खेळाडू म्हणून निवड

Nov 10, 2023


मनमाड चा पहिला आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू व राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा मुकुंद संतोष आहेर याची गुणवंत खेळाडू म्हणून क्रीडा गुणवत्तेच्या आधारावर मध्य रेल्वे च्या दादर विभागात सहाय्यक तिकीट निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या माध्यमातून छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या वेटलिफ्टिंग प्रशिक्षणामुळे आजवर अनेक खेळाडूना विविध ठिकाणी सरकारी नोकरीच्या संधी निर्माण झाल्या असून मुकुंद ने इयत्ता आठवी पासून सुरु केलेल्या सातत्यपूर्ण सरावामुळे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी एकाच वेळी भारतीय सैन्यदल व भारतीय रेल्वे अशा दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी केल्यामुळे नोकरीची संधी निर्माण झाली व मुकुंद ने रेल्वे ला प्राधान्य दिल्या मुळे त्याची ९.११.२०२३ पासून नियुक्ती करण्यात आली आहे
भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक व द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित विजय शर्मा व मध्य रेल्वे चे प्रशिक्षक क्रिस्टोफर यांनी मुकुंद ची वेटलिफ्टिंग मधील गुणवत्ता बघून नियुक्ती साठी विशेष प्रयत्न केले
मुकुंद च्या जडणं घडणीत मुकुंद च्या पालकांचा सिंहाचा वाटा असून त्याचे वडील संतोष आहेर व काका नाना आहेर व घरातील सर्व सदस्यांनी मुकुंद ला क्रीडा क्षेत्रात भरारी मारण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
सर्व सामान्य कुटुंबातील गुणवंत खेळाडू मुकुंद ला भारतीय रेल्वे मधील नोकरीच्या संधीमुळे मनमाड च्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
मुकुंद ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी मुकुंद चे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.