मनमाड:- एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील ज्येष्ठ ग्रंथपाल हमीद मन्सूरी यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हमीद मन्सूरी यांनी उपस्थितांना मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शाळेचे कनिष्ठ लिपिक शेख अखलाक अहमद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर व संस्थेच्या सदस्या आयशा मोहम्मद सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...








