नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव शहरात कडक दुष्काळ असतानांही रेल्वे गेट जवळील अंडर बायपास मध्ये नगरपालिका व मध्य रेल्वेच्या प्रशासनाच्या चुकीमुळे पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
नांदगाव शहर व परिसरात दुष्काळाचे भयाण संकट असताना व शहराला १५ ते २० दिवसांनी पाणी पुरवठा होत असताना नगरपालिकेच्या गलथान प्रशासनाच्या आर्शीवादाने रेल्वे गेट च्या अंडर बायपास मध्ये आज गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून या पाण्यातूनच रहिवाशी ये. जा करीत आहे .
नगरपालिकेची लिकेज असलेल्या पाईप लाईन मुळे या अंडर बाय पास मध्ये पाणी येत आहे. त्यातच रेल्वे प्रशासना च्या ठेकेदाराचा पंप नांदुरस्त झालेला असल्याने हे पाणी काढता येत नाही .एैन सणासुदीच्या दिवसात रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहे.









